– १८ हजार रुपयांची स्वीकारली लाच
The गडविश्व
गडचिरोली(Gadchiroli)२९ सप्टेंबर : रस्ता बांधकामाचे चेक देण्याकरिता ३१ हजार रुपयांची लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती १८ हजार रुपयांची लाच रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुलचेरा तालुक्यातील विवेकानंदपुर येथील ग्रामपंचायत सरपंचा श्रीमती. भावना शैलेन मिस्त्री (३०) यांना आज २९ सप्टेंबर रोजी रंगेहाथ पकडले आहे. सदर कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदारास सुकदेव हरेकृष्ण दास ते सपन मोहिनी शर्मा यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रोडचे केलेल्या बांधकामाचे चेक देण्याच्या कामाकरिता सरपंचा श्रीमती. भावना शैलेन मिस्त्री (३०) यांनी ३१ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली असता तक्रारीच्या अनुषंगाने सापळा कारवाई केली. यावेळी सरपंचा श्रीमती. भावना शैलेन मिस्त्री ह्या स्वतःच्या राहते घरी विवेकानंदपुर येथे पंचासमक्ष ताडजोडीअंती १८ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
याप्रकरणी सरपंचा श्रीमती. भावना शैलेन मिस्त्री यांच्यावर पोलीस स्टेशन मुलचेरायेथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोनि श्रीधर भोसले, पोहवा नथ्थु धोटे, पो.ना राजेश पदमगिरवार, पो.ना. श्रीनिवास संगोजी, पोशि संदीप उडाण, मपोशि विद्या म्हशाखेत्री, चापोहवा तुळशिराम यांनी केली.
सदर कारवाईने एकच खळबळ उडाली असून ग्रामपंचायत सरपंचा लाच रक्कम स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्याने प्रशासन पुन्हा काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.

©©©©©©©©©© बातमी जशीच्या तशी कॉपी पेस्ट करू नये, आम्हाला नॉटिफिकेशन येतो
#acb #sarpancha # acbtrap #mulchera #vivekanadpur