मुसळधार पावसाचा कार्यालयांनाही फटका : धानोरातील अनेक शासकीय कार्यालय ओसाड

305

The गडविश्व
ता.प्र / धानोरा (Dhanora), १३ सप्टेंबर : मुसळधार पावसाचा फटका शासकीय कार्यालायलाही बसल्याचे दिसले. रांझीनाला धानोरा गडचिरोली रोडवरचा आणि सोडे च्या कठाणी नदीला पूर आल्यामुळे रस्ते बंद झाले त्यामुळे धानोरा येथील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व इतर कर्मचारी काल १२ सप्टेंबर रोजी अनउपस्थित दिसले. साडेबारा वाजतापर्यंत प्रतिनिधींनी भेट दिली असता फक्त चतुर्थ कर्मचारी एक ते दोन प्रत्येक कार्यालयात दिसून आले या कार्यालयामध्ये महसूल मंडळ कार्यालय, उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, बाल विकास प्रकल्प, पंचायत समिती कार्यालय, सार्वजनिक जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पंचायत समिति कार्यालय, तहसील कार्यालय, उपकोषागार कार्यालय धानोरा यासह इतर सर्वच कार्यालयामध्ये एक चतुर्थ कर्मचारी व्यतिरिक्त कोणतेही कर्मचारी उपस्थित नव्हते.
सर्वांना शासनाच्या नियमाप्रमाणे मुख्यालय राहून सेवा बजावयाची असते परंतु एकही कर्मचारी धानोरा येथे मुख्यालय राहत नाही व वरील सर्व ठिकाणी भेट दिली असता महसूल आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय धानोरा या कामासाठी काही नागरिक आले होते व त्यांची वाट पाहत असतांना दिसत होते. दरम्यान त्यांच्या गेटला कुलूप लावलेला होता. त्यामुळे मुख्यालय कोण राहणार अधिकारीच राहत नाही तर कर्मचारी का म्हणून राहतील हा एक मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याच पद्धतीने आपत्ती व्यवस्थापन च्या कार्यालयाशी संबंधित असणारे जे काही अधिकारी व कर्मचारी तसेच महसूल मंडळ तहसील कार्यालय यातले कर्मचारी उपस्थित नव्हते. ग्रामपंचायत सचिव सर्व अपडाऊन करतात. त्याच पद्धतीने गडचिरोली ते धानोरा नव्हे तर सावरगाव पर्यंत दररोज अपडाऊन करणारे कर्मचारी दिसून येते जे ७० किलोमीटर पर्यंत दररोजअपडाऊन करतात आणि याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या कामात दिसून येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here