The गडविश्व
ता. प्र / धानोरा : पोलिस मदतकेंद्र मुरुमगाव येथे पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा., अपर पोलीस अधीक्षक समीर शेख सा.(प्रशासन), पोलीस अधीक्षक (अभि) सोमय मुंढे सा., अपर पोलीस अधीक्षक आहेरी अनुज तारे सा. यांच्या संकल्पनेतून तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग धानोरा, स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून महिलांना प्रधान मंत्री उज्ज्वला गॅस योजना २.० अंतर्गत महिलांचे आरोग्य चांगले राहावे, स्वयंपाकाच्या धुरामुळे श्वासांचे आजार होऊ नये म्हणून सदर योजणे अंतर्गत ५१ महिलाना काल ३१ मे रोजी स्वयंपाकाचा गॅस, शेगडी, रेग्युलेटर ईत्यादी साहित्य वितरित करण्यात आले. (त्यातील 13 महिला ह्या दत्तक गाव पणेमारा येथील आहेत) गॅसचे विराण केल्याने सर्व महिला आनंदी झाल्या व गडचिरोली पोलिस दल तसेच पोलिस मदत केंद्र मुरुमगाव यांचे आभार मानले.
यापूर्वी २६ जानेवारीचे औचित्य साधून महिलांना ३५ गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले होते. आज पावेतो एकूण ८६ जणांना गॅसचे वितरण करण्यात आले आहे. यापुढेही जास्तीत जास्त गॅस कनेक्शन वाटप करण्याची तजवीज ठेवली आहे.