The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ४ नोव्हेंबर : तालुक्यातील मुरुमगाव ग्रामपंचायत सभागृहात गुरूवार ३ नोव्हेंबर ला दुपारी १ वाजता तहसीलदार कल्याण कुमार दाहाड यांच्या अध्यक्षतेखाली चक्का जाम आंदोलन समिती चे पदाधिकाऱ्यां सोबत समस्यांवर निराकरण सभा संपन्न झाली.
या सभेत प्रमुख उपस्थिती म्हणून BDO प.स.धानोरा एस.आर. टिचूकले, गट शिक्षण अधिकारी धानोरा व्ही. आर. आरवेली, विस्तार अधिकारी जि.प.गड. अमरसिंग गेडाम, नायब तहसीलदार धानोरा डि.के.वाळके, उपप्रादेशिक व्यवसथापक एच.एस.सोनवणे, जि.प.बांधकाम विभाग बि.सी.धार्निक, जि.प. बांधकाम विभाग ए.एम.अगळे, कार्यकारी अभियंता धानोरा डी.डी.शेंडे, धर्मानदं मेश्राम, केन्द्र प्रमुख अरूण सातपुते, तलाठी मेश्राम, क्षेत्र साहाय्यक पक्षिम मुरुमगाव पि.जी.देशपांडे, पशुधन विकास अधिकारी डा.रोहन गालफोडे, T.H.O.धानोरा डाॅ.ए.एस.डेकोगाडे, उप अधिक्षक भूमिअभिलेख धानोरा पोलीस.एम.नाकाडे, वैद्यकीय अधिकारी मुरुमगाव डाॅ. राहूल बनसोड, क्षेत्र साहाय्यक वाय.सि.करेवार, क्षेत्र साहाय्यक सयाम,पोलीस उपनिरीक्षक मुरुमगाव चंद्रकांत धनके, सचिव ग्रामपंचायत मुरुमगाव वि.बि.आखाळे, डाॅ.सुनिल मडावी, माजी पचांयत समिति सभापती धानोरा अजमन मायाराम रावते, माजी जि.प.सदस्य सौ.लताताई पूगांटे, सरपंच मुरुमगाव शिवप्रसाद गवरना, उपसरपंच मुरुमगाव मथनूराम मलिया, मूनिर शेख, शिवनाथ टेकाम, पोलीस पाटील वसतं कोलीयारा, चावनशाह मडावी, भूपेनद्रशाह मडावी, सरपंच हिरंगे कवलसिगं राणा, सरपंच पन्नेमारा हरीश धुर्वे, निरंगसाय मडावी, मदनलाल बढई, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य अंजूताई मैदमवार, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कोठवार, ग्रामपंचायत मुरुमगाव येथील समस्त नागरिकांनी उपस्थित होते.
चक्का जाम आंदोलन मध्ये ज्या ज्या समस्यांवर पदाधिकाऱ्यांकडून विविध विषयांवर मागणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते त्या सर्व विषयांवर एक एक करून चर्चा करण्यात आले. व त्या मधून को-ऑफ रेटिव बँक करीता मुरुमगाव ग्रामपंचायत ने ठराव पारित करण्यात येणार, गामीण रुग्णालयाची मागणी मुरुमगाव करीता अतिशय आवश्यक आहे असे ठरविले, मुरुमगाव व औधीं मार्ग निर्माण कार्य खडीकरण व डांबरीकरण अतिशय आवश्यक आहेत असे ठरविण्यात आले, डाॅ.छाया बाबूराव उईके याची मुरुमगाव प्राथमिक आरोग्य केंद्र यथे नियुक्ती करण्यात यावी मागणी केली, संपूर्ण सबंधित विभागाचे कर्मचारीवर्ग व अधिकारी यांनी त्वरीत आपल्या मुख्यालयात हजर राहावे असे आदेश पत्र जारी करण्यात आले. सबंधित महत्वाचे मार्ग निर्माण कार्य खडीकरण व डांबरीकरण मध्ये मुरुमगाव ते औधी, मुरुमगाव, तूमळीकसा, हिरंगे, कूलभटी बोदनखेळा मार्ग, पन्नेमारा व सिंदेसूर मार्ग निर्माण कार्य खडीकरण व डांबरीकरण करीता नेमणूक करण्यात आले, वनपट्टे धारकास १३ डिसेंबर २००५ पूर्वीचे पूरावा सादर करण्यात यावा, व इतर नागरिकांना पिढीचा पूरावा सादर करण्यात यावा, त्याच प्रमाणेच शासकीय पोस्ट बेसिक आश्रम शाळा मुरुमगाव येथे वर्ग ११,१२ वी चे मागणी घेऊन विषेश चर्चा करण्यात आली. धानोरा तालुक्याचे तहसीलदार कल्याण कुमार दाहाड यांनी कास्टसर्टिफिकेट करीता १९५० पूर्वीचे पूरावे गरजेचा सांगीतले, धानोरा तालुक्यात एकूण १४ पशूऔषाधालय आहेत व पशू वैद्यकीय अधिकारी ३, मुरुमगाव येथे पशुवैद्यकीय अधिकारी ची नियुक्त करण्यात यावी अशा मागणी बद्दल चर्चा करण्यात आले व पशू औषाधालय मुरुमगाव येथील सबंधित कर्मचारी वर्ग पैसे घेण्याचे आरोप लावण्यात आले.
मुरुमगाव येथे समाजकल्याण तर्फे मूले व मुलीचे वसतीगृहात बऱ्याच वर्षांपासून मुलाची संख्या नाही या बद्दल चर्चा करण्यात आली. वनविभाग तर्फे क्रीडांगण व बगीचा याची मागणी घेऊन विषेश चर्चा करण्यात आले, त्या नंतर तहसीलदार कल्याण कुमार दाहाड यांनी संजय गांधी, राष्ट्रीय कुटूंब साहाय्यक योजना, व श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजने अंतर्गत धनादेश माहे सप्टेंबर २०२२ पर्यंत जमा करण्यात आले आहेत असे सांगीतले.
तहसीलदार कल्याण कुमार दाहाड यांनी सबंधित विषयावर चर्चा करून नोंदी लिहून घेतल्या. संपुर्ण समस्या जिल्ह्य़ा पातळीवर पाठवित असल्याचे आश्वासन आंदोलन करनाऱ्या समितिला दिले.