मिचगाव (बुज) ग्रामपंचायतीला मिळाला प्रभात बक्षिस पुरस्कार

421

The गडविश्व
ता.प्रतिनिधी / धानोरा : तालुक्यातील मिचगाव (बुज) ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्राम अभियान अंतर्गत सन २०१९-२० चा प्रभात बक्षिस पुरस्कार पटकाविला आहे.
संत गाडगेबाबा ग्राम अभियानाअंतर्गत धानोरा पंचायत समिती च्या वतीने प्रभात बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला संवर्ग विकास अधिकारी कोमलवार, पंचायत अधिकारी बाबर , पंचायत विस्तार अधिकारी जुवारे , कृषी विस्तार अधिकारी ठाकरे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये सन २०१९ -२० या वर्षाचा प्रभात  बक्षीस दहा हजार रुपयांचा चेक नुकताच पंचायत समिती सभागृह मध्ये मिचगाव (बुज) ग्रामपंचायत च्या वतीने सरपंचा सौ.जोत्स्ना प्रमोद कोवे, उपसरपंच वालको व सचिव के.जी.नेवारे यांनी स्वीकारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here