मा.जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

344

– नारायणपूर येथे भव्य टेनिस बॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
The गडविश्व
सिरोंचा : तालुका अंतर्गत येत असलेल्या नारायणपूर येथे आविसं शाखा व बालाजी क्रिकेट क्लब नारायणपूरच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य टेनिस बॅल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विशेष अतिथी म्हणून आदिवासी विद्यार्थी संघाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, माजी जिल्हा परिषद सदस्या जयसुधा जनगाम हे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंचा रजिता सडमेक, उपसरपंच अशोक हरी, नागराजू इंगली, मराय्या मोरे, मलान्ना पांते, तंटामुक्त अध्यक्ष गट्टू चम्माकरी, वेंकन्ना ताला, अशोक इंगली, आविसं सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिट्याला हे होते.
ग्रामीण भागात क्रीडा स्पर्धा घेतल्याने ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडा विषय उत्सकता निर्माण होते आणि उत्तम खेळाळू तयार होतात असे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी व्यक्त केले.
भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक माजी आमदार दिपकदादा आत्राम व आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांचेकडून ५० हजार रोख रक्कम व शिल्ड, द्वितीय पारितोषिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार ३० हजार रुपये रोख रक्कम व शिल्ड तृतीय पारितोषिक नागराजू इंगली व उपसरपंच अशोक हरी यांचेकाडुन २० हजार रुपये रोख रक्कम व शिल्ड असे तीन पारितोषिक विजेत्या संघाला देण्यात येत आहे.
यावेळी मलाय्या तोंबेरा, शंकर दाया, लक्ष्मण बोल्ले, समय्या येदरु, संपत कडेकरी, शेखर चम्माकरी, वेंकटेश इंगली, राजन्ना भंडारी, वेंकटेश कडेकरी, वेंकटेश हरी, राजन्ना कडेकरी, रामूलू इंगली, राजेश पडालवार, वेंकटेश इंगली, प्रकाश इंगली, राजबापू नुकूम, राजन्ना इंगली, राजू नस्कुरी, संपत हरी, पूनम इंगली, दिनेश कोय्याला, श्रीनिवास पासूला, राजेश मंथेना, वेंकटी पासूला, मधुकर नीलम, जांपाय्या पासूलासह क्रीडा प्रेमी व आविसंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here