मा.जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते कोतपल्ली येथील नळ योजनेचे भूमिपूजन

225

– कोतपल्ली वासीयांची पाणी समस्या होणार दूर
The गडविश्व
सिरोंचा : तालुक्यातील ग्रामपंचायत पोचमपल्ली अंतर्गत येत असलेल्या कोत्तापली येथे नळ योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली. सदर कामाचे भूमिपूजन मा. जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
ग्रामपंचायत पोचमपल्ली हद्दीतील गावांमध्ये उन्हाळ्यात नेहमीच पाणी टंचाई निर्माण होत असते यामुळे नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र दूरवर भटकंती करावे लागते. पाणी समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायत पोचमपल्लीच्या उपसरपंचा ललिता सल्ला यांनी मा. जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार हे अध्यक्ष असतांना त्यांना कोत्तापली गावात नळ योजना मंजूर कारण्यासंदर्भात मागणी केली होती. यावेळी मा. जि.प.अध्यक्षांनी नळ योजनेकरिता मंजुरी दिली व सदर कामाचे भुमिपुजन नुकतेच केले. यामुळे आता गावांतील पाणी समस्या दूर होणार असून गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी मा. जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, सरपंचा चंद्रया सिंगानेनी, उपसरपंच ललिता सल्ला, ग्रामपंचायत सदस्य राजेसमू सोन्नारी, सारया सोन्नारी, आविसा तालुका अध्यक्ष बानया जनगम, ग्रामपंचायत असरेअलीचे सरपंच रमेश तैनेनी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मलिकार्जुन आकुला, नगर पंचायत समिती सिरोंचाचे उपाध्यक्ष बबलू पाशा, धर्माया कोठारी, संतोष भीमकरी, आविसा सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिटयाला, सत्यम बेलामकोंडा, अब्दुल गफूर, कलाम भाई, श्रीनिवास गोरे, मधुकर असरेअली, गणेश रचावार, सुधाकर कुमरी, सडवली जिमडे, रवी कोत्तापल्ली, रमेश सल्ला, सह पोचमपल्ली परिसरातील आविसाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here