माझी वसुंधरा २.० अंतर्गत न.प.गडचिरोलीची यशस्वी कामगिरी

335

The गडविश्व
गडचिरोली : स्वच्छ भारत अभियान (नागरी) माझी वसुंधरा 2.0 अंतर्गत गडचिरोली नगर परिषदेने सन 2021-22 च्या ODF++ या स्पर्धेत यशस्वी कामगिरी केलेली आहे. 6 व 7 एप्रिल 2022 रोजी राज्य व केंद्र शासनामार्फत स्वच्छ सर्वेक्षण च्या प्रत्यक्षात कार्यक्षेत्राची पाहणी दरम्यान अटी व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. तपासणी चमूच्या समाधानकारक अहवालानंतर दि. 31 मे 2022 रोजी स्पर्धेच्या प्रदर्शित झालेल्या निकालामध्ये गडचिरोली नगर परिषद यशस्वी झाली आहे. मुख्याधिकारी नगर परिषद, गडचिरोली विशाल वाघ हे रुजु झाल्यापासून सार्वजनिक स्वच्छालयाची दुरुस्ती व मनमोहक चित्रीकरण करणे, तसेच सार्वजनिक स्वच्छालयाची देखभाल करणे, शहरात विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत विविध उपक्रम घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली, ही संपूर्ण कामे प्रभारी आरोग्य निरीक्षक रविंद्र भंडारवार यांनी उल्लेखनिय कामे पार पाडली. यात कार्यालयीन कर्मचारी, सफाईकामगार संपूर्ण स्वच्छता विभागाने परीश्रम घेतले. तसेच नागरीकांनी स्वच्छता विषयक उत्सुकपणे सहभाग दर्शविला असे मुख्याधिकारी नगर परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here