– माजी जि. प. अध्यक्ष डॉ.सतीश वारजूकर यांच्या उपस्थितीत भूमिपूजन
The गडविश्व
चिमूर , ४ ऑगस्ट : तालुक्यातील तिरखुरा येथे वाचनालय व अभ्यासकेंद्राचे आज ४ ऑगस्ट रोजी भूमिपूजन सपंन्न झाले. सदर भूमिपूजन माजी जि. प. अध्यक्ष डॉ.सतीश वारजूकर यांच्या उपस्थितीत पार पडले.
तालुक्यातील तिरखुरा येथे माजी जि. प. अध्यक्ष डॉ.सतीश वारजूकर हे काही दिवसांपूर्वी कार्यक्रमानिमित्त गेले असता. स्थानिक विद्यार्थ्यांनी गावामध्ये वाचनालय व अभ्यासकेंद्राची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत वारजूकर यांनी जिल्हा परिषद चंद्रपूर च्या जिल्हा निधीतून वाचनालय व अभ्यास केंद्रासाठी निधी उपलब्ध करून दिला. आज सदर वाचनालय व अभ्यास केंद्राचे भूमिपूजन माजी जि. प. अध्यक्ष डॉ.सतीश वारजूकर यांच्या प्रमुख उपस्थितीत किशोरभाऊ शिंगरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे आता तिरखुरा येथील विद्यार्थ्यांना वाचनालय व अभ्यासकेंद्र उपलब्ध होणार आहे. भूमिपूजन प्रसंगी प्रामुख्याने ग्राम पंचायत उपसरपंच बालाजी जांभूळे, विकाशजी शिंदे, ग्राम पंचायत सदस्य प्रविणाताई डांगे, ग्राम पंचायत सदस्या वणीताताई मडकाम, ग्राम पंचायत सदस्या शारदाताई शिरभये, किशोरजी डांगे, राजेंद्र डांगे, मनीष वाघ, दिवाकर कुळमेथे, ताराचंद लोखंडे, ताणाबाई लोखंडे, अपर्णा डांगे, पौर्णिमा लोखंडे, शशिकला डांगे, राकेश डांगे, सेजल लोखंडे, प्राची डांगे, बादल डांगे, महेश मेश्राम, कुणाल मडकाम, पवन मगर, अक्षय लोखंडे, स्वप्नील जांभूळे, अमित पाटील, सोनल धाडसे, येशोधरा लोखंडे, विमलबाई डांगे उपस्थित होते.
