The गडविश्व
अहेरी : दहा वर्षीय बालकाच्या मुत्रपिंड शस्त्रक्रिया करण्याकरिता माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी पुढाकार घेत आर्थिक मदत केली आहे.
येल्ला येथील अर्जुन रामटेकेचे वडील विठ्ठल रामटेके हे एक वर्षा अगोदर कॅन्सर आजाराने स्वर्गवासी झाले. घरात करता पुरुष नसल्याने संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा भार आई वर होते. अर्जुन ची आई मोल मजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होती. मात्र अचानक दहा वर्षीय अर्जुनच्या पोटात दुखत असल्याने त्याला दवाखान्यात नेले असता मूत्र पिंडात समस्या असल्याने शस्त्रक्रिया करण्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मुलांची आई व मुलगा अर्जुन माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे येऊन आपली आपबिती सांगितली. दरम्यान कंकडालवार यांनी लगेच शस्त्रक्रिया करण्याकरिता आर्थिक मदत केली.
यावेळी अहेरी न.पं. अध्यक्ष कु.रोजा करपेत , उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नगरसेवक विलास गलबले, नगरसेवक महेश बाकेवार उपस्थित होते.