The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील बोरी ग्राम पंचायत अतंर्गत येत असलेल्या रामपूर येथे हनुमान जयंती निमित्त हनुमान मूर्तीची माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते प्रतिष्ठापणा करण्यात आली.
रामपूर येथे हनुमान मंदिर होते मात्र मंदिराची दूरावस्था झाली होती. जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून मंदिर दूरूस्ती करण्याकरिता आर्थिक मदत देण्यात आली होती व मंदिर दुरुस्त करण्यात आले. आज हनुमान जयंतीदिनी जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते मूर्ति प्रतिष्ठाणा करण्यात आली.यावेळी अहेरी न.पं. चे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, राजापूर प्याचच्या सरपंचा सौ. मीना मधुकर वेलादी, सदस्य मधुकर वेलादी, माजी सरपंच रामलू कुळमेथे, सदस्य संतोष पंदीलवार, ग्रा.पं.सदस्य सुरेश गंगादरीवार, ईश्वर प्रसाद बोलमपल्लीवर, मुरलीधर कोडसेपवार, सुभाष सावकार गोंड्रालवार, दिवाकर चठारे, मारोती पुल्लीवर,कार्तिक ठाकरे, किसन टेकूलवार, गोपाळा चांदेकर, सर्व भक्तजन, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.