माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

365

– अहेरी येथील प्रभाग क्र.१३ बोद्धविहार येथे दिली भेट
The गडविश्व
अहेरी : काल १४ एप्रिल रोजी देशभरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वि जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अहेरी येथील प्रभाग क्र.१३ मधील बोद्धविहार येथे माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट देत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
अहेरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अहेरी येथील प्रभाग क्र.१३ मधील बोद्धविहार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले.
यावेळी अहेरी नगर पंचायत उपाअध्यक्ष शैलेशभाऊ पटवर्धन, बालकल्याण सभापती सौ.मिनाताई ओडरे, माणिक ओडरे, चांदेकर (RI), मिलिंद अलोन, संदीप डोलगे, शाम ओडरे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here