– नगर पंचायतचे पदाधिकारी यांचीही उपस्थिती
The गडविश्व
अहेरी : येथे बाजारवाडी उपलब्ध आहे मात्र त्याठिकाणी सोईसुविधा पाहिजे त्या प्रमाणात नसल्याने व्यापारी वर्ग व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अहेरी येथील काही भाजीपाला विक्रेते रस्त्याच्या कडेला दुकाने लावत असतात तसेच मटण विक्रेत्यासाठी योग्य ठिकाण नाही. त्यामुळे माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मटण मार्केट मध्ये जावून जागेची पाहणी करून योग्य जागा उपलब्ध करून देण्यात येईल अशी चर्चा करण्यात आली.
यावेळी अहेरी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष कु. रोजा करपेत, उपाध्यक्ष शैलेशभाऊ पटवर्दन, बालकल्यान सभापती सौ. मिनाताई ओडरे, नगर सेवक विलास सिडाम, नगरसेवक सौ.सुरेखा गोडसेलवार, नगरसेवक सौ.जोतीताई सडमेक, नगर सेवक नोउरास शेख, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नगरसेवक विलास गलबले, नगर सेवक महेश बाकेवार, नगर सेवक श्रीनिवास चटारे, अहेरी नगरपंचायतचे मुख्याधिकारी अजय सडवे, मिलिंद अलोन, शाम ओडरे, कुमार गुरनुले, कार्तिक तोगम, विनोद रामटेके तसेच व्यापारी वर्ग उपस्थित होते.
