माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी इंदाराम येथे वीर बाबूराव शेडमाके यांना केले अभिवादन

326

– इंदाराम येथे वीर बाबूराव शेडमाके यांना अभिवादन
The गडविश्व
अहेरी, २२ ऑक्टोबर : तालुक्यातील इंदाराम येथे आज वीर बाबूराव शेडमाके यांना अभिवादन करण्यात आले.अभिवादन कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून वीर बाबूराव शेडमाके यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच सदर कार्यक्रमाला आर्थिक मदत केली. १८५७ चे स्वातंत्र्यवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके ज्यांनी चंद्रपुर- गडचिरोली भागातील सावकार, तथा इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता. गडचिरोली व चंद्रपुर येथील गोंड, तथा इतर गैर गोंडियन समाजास सावरकरांच्या जाचातून त्यांच्या हूकूमशाही व अत्याचारातून सुटका करून देण्या करिता वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी प्रत्येक समाजातील तरून युवकांना सोबत घेऊन जंगोम सेना तयार केली व सावकार ,आणी इंग्रजांच्या विरूद्ध लढाई सुरू केली. बाबुरावांना व जंगोम सेनेला भरपुर यश मिळाले होते.
सदर कार्यक्रमासप्रसंगीगुलाबराव सोयाम माजी सरपंच इंदाराम, शामराव मडावी, मुसली तालांडे,पांडुरंग तोर्रेम, लक्ष्मण सिडाम,नामदेव तोर्रेम, सत्यवान मडावी,मलेश तालांडे, नामदेव कोरेत, लालसू आलाम, जयराम मडावी, बापू सिडाम, आनंदराव गोसकूल, संतोष कोडापे, दिलीप मडावी, सुनंदा कनाके, लखमा सडमेक, सरीता कोरेत, जयाबाई सिडाम, पुष्पाबाई तालांडे, तानुबाई सोयाम, गिरजाबाई तालांडे, लक्ष्मी तालांडे, गिरीजा मडावी, बिचुबाई मडावी, गंगुबाई कोरेत, संजय कोरेत, अनिल नैताम, मोरेश्वर साडमेक, संदीप सोयाम, निखिलेश तलांडे, अशोक कोरेत, निलेश पोरतेट, अविनाश कोरेत, रुपेश तलांडे, नामदेव तलांडे, मनोज सोयाम व समाजातील महीला व पुरुष बहुसंकेने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here