माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते चेरपल्ली येथे माता मंदिरचे उद्घाटन

429

The गडविश्व
अहेरी : स्थानिक नगरपंचायत क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या चेरपल्ली येथील माता मंदीरचे गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
चेरपल्ली येथे माता मंदिर नसल्याने प्रत्येक वर्गातील समाजबांधवांना अडचण भासत होती. गावात माता मंदिर होते मात्र लाकडा पासून तयार केले होते, प्रत्येक वैयक्तिक कार्यक्रम असो, सण उत्सव असो अथवा सामाजिक कार्यक्रम असो सर्वप्रथम माता मंदिरात जावून पूजा करूनच बाकीचे कार्यक्रम पार पाडत असत.
मात्र माता मंदिर व्यवस्थित नसल्याने चेरपल्ली येथील सर्व समाज बांधवांनी गावात बैठक घेवून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे माता मंदिर बांधकामकरिता निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असता अजय कंकडालवार यांनी माता मंदिर बांधकामाकरिता निधी प्राप्त होत नाही मात्र मी माझ्या स्वखर्चाने माता मंदिर बांधून देतो अशी ग्वाही दिली होती. सदर बांधकाम हे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून पूर्ण झाले. आज सदर मंदिराचे उदघाटन माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते पूजा अर्चना करून रितसर पार पडले.
यावेळी अहेरी नागरपंचयतीचे नागराध्यक्ष रोजा करपेत, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, आविस कार्यकर्ते विनोद रामटेके, बापु कन्काबंडावार, रवि कांबळे, प्रविण अगुंवार, सतिश दुर्गे, रमेश करपेत, नामदेव तंलाडे, सुदाकर दुर्गे, संतोष जिल्लावार, नानु कुळमेथे, गणेश झाडे, संतोष झाडे, सुधाकर रामटेके, दशरथ सुनतकर, नागेश अंगुवार, राजेश कोडांवार, दिलीप दुर्गे , रामकृष्ण दुर्गे तसेच समस्त गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here