माँ दंतेश्वरी दवाखाना, सर्च येथे कर्करोग ओपिडीचे आयोजन

137

– नागपुर येथील तज्ञ डॉ. सुशील मानधनीया यांच्याकडून उपचार
The गडविश्व
गडचिरोली, १३ ऑगस्ट : जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील चातगाव येथे असलेल्या सर्च येथील माँ दंतेश्वरी दवाखाना येथे कर्करोग ओपिडीचे आयोजन करण्यात आले आहे. या ओपिडी करिता नागपुर येथील तज्ञ डॉक्टर सुशील मानधनिया हे उपचार करण्याकरिता येणार आहेत. तरीही गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या ओपिडीकरिता उपस्थित राहून आपल्याला असलेल्या कर्करोगाविषयीच्या समस्यांवर उपचार घ्यावा. ही ओपिडी दर महिन्याच्या तिसर्या् गुरुवारी आयोजित केली जाते.
धूम्रपान, मद्यपान केल्याने हा रोग बहुतांश नागरिकांमध्ये आढळून येतो परंतु हे व्यसन नसतांनाही आता आंनेकांमध्ये कर्करोगाचे निदान होत आहे. लहान – लहान मुलांपासून तर वयोवृद्धांमध्येही हा रोग आढळून येतो. याचे कारण म्हणजे आजची जीवनशैली, आरोग्याची योग्य काळजी न घेणे अशा अनेक गोष्टींमुळे या आजारांचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागतो. कर्करोगावर मोठमोठ्या दवाखान्यांमध्ये उपचार करण्यात येतात, आणि याठिकाणी भरमसाठ असा खर्च सुद्धा लागतो. सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर हा खर्च असतो म्हणूनच माँ दंतेश्वरी दवाखाना येथे गडचिरोली भागातील नागरिकांच्या सुविधेकरिता या ओपिडीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, पुणे, नागपुर सारख्या मोठ्या शहरातून तज्ञ डॉक्टर याठिकाणी येऊन कमी खर्चात उपचार करतात. ग्रामीण तसेच आदिवासी भागातील नागरिकांच्या सोयीकरिता या ओपिडीचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील तसेच इतरही जिल्ह्यातील नागरीकांनी या ओपिडीचा लाभ घ्यावा.
छाती किंवा शरीराच्या इतर भागात गाठ जाणवणे, त्वचेवर नवीन तीळ उद्भवणे किंवा असलेल्या तिळात बदल होणे, बरी न होणारी जखम, आवाज बसणे किंवा खोकला बरा न होणे, पचनसंस्थेत किंवा लघवी होण्याच्या सवयींमध्ये बदल, खाल्ल्यानंतर अस्वस्थ वाटणे, गिळताना फार त्रास होणे, विनाकारण वजन वाढणे अथवा घटणे, अनैसर्गिक रक्त अथवा इतर स्त्राव होणे, फार थकल्यासारखे वाटणे, या प्रकारच्या कोणत्याही समस्या जर शरीरात जाणवत असतील तर माँ दंतेश्वरी दवाखाना येथे आयोजित ओपिडी करिता सर्च येथील माँ दंतेश्वरी दवाखाना येथे नोंदणी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here