The गडविश्व
देसाईगंज : महिला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे काल १० फेब्रुवारी रोजी विश्रामगृह येथे नारी शक्ती सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील उल्लेखनीय कामगिरी बजावनाऱ्या महिलांचा उपस्थित महिला मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
आजच्या घडीला महिला वर्ग सर्वच क्षेत्रात काम करीत असून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सामोरे जात आहेत. आजची नारी शक्ती पूर्वीप्रमाणे केवळ चूल आणि मूल याकडेच लक्ष केंद्रित करणारी नसून प्रबळ इच्छाशक्ती व सर्वसमावेशक असल्याचे दिसून येत आहे. अशा नारी शक्तीला उंच भरारी घेण्यासाठी सर्व महिलांनी पुढाकार घेऊन प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. याकरिताच देसाईगंज येथील विश्रामगृहात तालुका महिला काँग्रेस कमिटीतर्फे नारी शक्ती कार्यक्रम आयोजित करून उपस्थित महिला मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून सर्व महिलांना बांगड्या भरून देण्यात आल्या व एक अनोखा आगळा-वेगळा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी महिला काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षा आरती लाहेरी,तालुका उपाध्यक्षा तथा आमगाव सरपंचा रुपलता बोदेले, तालुका सचिव सोनाली घोरमोडे, शराध्यक्षा भारती कोसरे, शहर उपाध्यक्षा मनीषा टेटे, टीम लिडर मंदाबाई पेंदरे, सदस्या शांताबाई घुले, सदस्या वंदना हर्षे, शर्मिला दहिकर अनुसूचित जाती तालुका अध्यक्षा, समिता नंदेश्वर अनुसूचित जाती तालुका महासचिवमेघा गजघाटे अनुसूचित जाती तालुका सचिव व बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.