महाविकास आघाडी सरकार कोसळताच शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस

535

The गडविश्व
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार कोसळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस आल्याच्या याच्या टायमिंगची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. सरकार कोसळताच राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. २००४, २००९, २०१४ आणि २०२० मध्ये दाखल केलेल्या निवडणूक शपथपत्रांसंदर्भात आयकर विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे.
एकीकडे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि दुसरीकडे शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस आली. त्यामुळे या नोटीसीची चर्चा आता सुरु झाली आहे. आधीच केंद्र सरकारकडून केंद्रीय संस्थांचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप होत असताना या कारवाईमुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्याकडे बोट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here