महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत गैरप्रकार : उमेदवारावर कारवाई बडगा

455

The गडविश्व
मुंबई, ७ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१ संयुक्त पेपर १ करीता काल ६ ऑगस्ट रोजी विविध केंद्रांवर परीक्षा पार पडली. यावेळी पुणे जिल्हा केंद्रांवरील नऱ्हे येथील उपकेंद्रावर गैरप्रकार आढळून आला असता त्या उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे .
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१ संयुक्त पेपर १ करीता काल ६ ऑगस्ट रोजी आयोजित परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली. त्यामध्ये पुणे जिल्हा केंद्रांवरील नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग चैनसिंग गुसींगे या उमेदवाराकडे गैरप्रकाराच्या उद्देशाने लपवलेले मोबाईल फोन व ब्ल्यूटूथ इयर फोन इत्यादी साहित्य सापडले. या उमेदवारावर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. आयोगाने याविषयी ट्विटही केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here