– संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे आणि प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान यांची भेट
The गडविश्व
गडचिरोली, ५ नोव्हेंबर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर ३५०० किमी ची भारत जोडो पदयात्रा निघाली असून या यात्रेचे ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात आगमन होणार आहे. ही यात्रा १५ दिवस महाराष्ट्रात राहणार असून नांदेड पासून हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे बुलढाणा जिल्ह्यातुन पुढे मध्यप्रदेशात जाणार आहे. या पदयात्रेदरम्यान राहुल गांधी रस्त्यात भेटणाऱ्या शेतकरी, मजूर, लघु मध्यम उद्योगपती, युवक, सारख्या असंख्य लोकांशी बोलून त्यांच्या अडचणी समजून घेत आहे.
काँग्रेस प्रणित राज्यात कर्मचाऱ्या साठी जुनी पेन्शन लागू करण्यात आलेली आहे. आणि येणाऱ्या काळात काँग्रेसची सत्ता ज्या राज्यात येईल तिथे जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे काँग्रेस ने जाहीर केले असल्याने. या संघटनेचे पदाधिकारी राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ इच्छित आहे. करिता त्यांनी गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आणि प्रदेश काँग्रेस महासचिव तथा भारत जोडो यात्रा जिल्हा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांची भेट घेतली व हजारोंच्या संख्येने जुनी पेन्शन संघटनेचे पदाधिकारी जिल्ह्यातून भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचे कळविले. यावेळी निवेदन देतांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरुदेव नवघडे, उपाध्यक्ष अंकुश मैलारे, सरचिटणीस बापू मूनघाटे, गणेश आखाडे आणि शिष्टमंडळ उपस्थित होते.