महात्मा गांधी महाविद्यालयातील भूगोल विभागातर्फे शैक्षणिक सहलीचे आयोजन

166

The गडविश्व
ता.प्र. / आरमोरी, २३ नोव्हेंबर : स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.पं. वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी येथे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली भूगोल विभागाच्या वतीने गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित बि. ए. भूगोल विषयाच्या हिवाळी-२०२२ सत्रातील शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी तलाव परिसंस्थेचा अभ्यास करून यामध्ये तलाव परिसंस्थेतील विविध घटकांचा सखोल अभ्यास केला. ज्यामध्ये वनस्पती आणि प्राणी जीवन यांच्यातील अन्नसाखळी, अन्नजाळी, उत्पादक, भक्षक व अपघटक इत्यादी विषयी सखोल माहिती जाणून घेतली. याप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.
भौगोलीक व शैक्षणिक सहलीच्या यशस्वी आयोजनामध्ये भूगोल विभागप्रमुख प्रा. पराग मेश्राम, डॉ. विजय गोरडे व बी.ए. भूगोल विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

#armori #M G college Armori #gadchiroli #armori #the gadvishva

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here