– पुन्हा दारूविक्री न करण्याचे ठणकावून सांगितले
The गडविश्व
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मकेपल्ली येथे मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेने गुरुवारी संयुक्त कृती करीत २५ हजार रुपये किंमतीचा मोहफुलाचा सडवा व दारू नष्ट केली.
मकेपल्ली येथे सहा घरी अवैध दारूची विक्री केली जाते. या गावाला लागून असलेल्या माडे आमगाव, लाल बोंदरी, मकेपल्ली चक नंबर १, चक नंबर २ या गावातील मद्यपी दारू पिण्यासाठी येतात. मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेने संयुक्तरित्या गावातील चार विक्रेत्यांच्या घरी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान एका घरी २० हजारांचा दोन ड्रम मोहफुलाचा सडवा व ५ हजार रुपये किमतीची २५ लिटर दारू मिळून आली. असा एकूण २५ हजारांचा मुद्देमाल नष्ट करीत पुन्हा दारूविक्री न करण्याचे ठणकावून सांगण्यात आले. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक आनंद इंगळे, उपसंघटक आनंद सिडाम यांच्यासह गाव संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.