– कुलकुली येथे ग्रापंचायत समिती पुनर्गठित
The गडविश्व
गडचिरोली,१२ जुलै : गावातील अवैध दारू व तंबाखू विक्री बंद करून भावी पिढी व्यसनमुक्त करण्याचा निर्णय आरमोरी तालुक्यातील कुलकुली ग्रामपंचायत समितीने घेतला आहे.
कुलकुली येथे ग्रामपंचायत समितीची बैठक सरपंच विलास बावणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी कुलकुलीचे पोलीस पाटील श्रीदास गेडाम, रामटोला येथील पोलिस पाटील विनायक उईक, नवरगाव येथील पोलिस पाटील सविता कोळी,आशावर्कर वैशाली ढवळे, उषा नाकाडे, ग्रामसेवक सोमेश्वर सहारे, अंगणवाडी सेविका गोपिका पेंदाम, सुनीता पेंदाम, चाफेकर, तंटामुक्ती अध्यक्ष लोकमित्र रामटेके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत समितीचे पुनर्गठन करण्यात आले. ग्रामपंचायत समितीचे सदस्य गावातील अवैध दारू विक्री बंद करतील, सुगंधित तंबाखू, खर्रा विक्री बंद करण्याची सूचना दुकानदारांना देतील, गावातील दारूच्या व्यसनींना उपचार देण्यासाठी व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करतील, आदी कार्य करून दारू व तंबाखूमुक्त गाव निर्माण करण्यासाठी समिती पुढाकार घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच गाव परिसरातील दारूविक्रेत्यांकडून शपथपत्र लिहून घेत पुन्हा दारूविक्री न करण्यासंदर्भात सूचना देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी तालुका संघटिका भारती उपाध्ये यांनी ग्रामपंचायत समितीचे उद्देश व अधिकार याबाबत मार्गदर्शन केले.