भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची निवड

945

– कसोटी, वनडे आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटचे नेतृत्व रोहित शर्मा कडे
The गडविश्व
मुंबई : भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा विराट कोहलीने राजीनामा दिल्यानंतर कसोटी संघाचे कर्णधारपद रिक्त होते. त्यामुळे भारतीय संघाचा पुढील कसोटी क्रिकेट कर्णधार कोण होणार याबाबतची जोरदार चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून भारतीय संघाला कायमस्वरुपी कसोटी कर्णधार मिळाला असून आयसीसीने ट्विट करत कसोटी कर्णधाराचे नाव जाहीर केले आहे. बीसीसीआयने (BCCI) रोहित शर्माची टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारपदी निवड केली आहे. त्यामुळे आता यापुढे रोहित शर्माच कसोटी, वनडे आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here