– कर्णधार आणि उपकर्णधारही पॉझिटिव्ह, कोच ड्रिंक्स घेऊन मैदानात
The गडविश्व बारबाडोस : अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का लागला आहे. बुधवारी आयर्लंडविरुद्ध टीम दुसरी मॅच खेळत आहे, पण मॅचआधीच कर्णधार यश ढूल आणि उपकर्णधार एसके राशिद मैदानात उतरले नाहीत. कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे दोघंही आयसोलेट झाले आहेत. टीम इंडियाच्या वर्ल्ड कपच्या तयारीसाठी हा मोठा झटका आहे. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात निशांत सिद्धू टीमचे नेतृत्व करत आहे.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार टीमचे अर्धा डझन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, या कारणामुळे टीमच्या कोचना मैदानात ड्रिंक्स घेऊन जावे लागत आहे. यश ढूल आणि राशिदशिवाय मानव प्रकाश, सिद्धार्थ यादव, आराध्य यादव आणि वासू वत्स आयसोलेशनमध्ये आहेत. खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे टीमची स्थिती खराब आहे. मॅचसाठी प्लेयिंग इलेव्हनची निवड करणेही भारताला अडचणीचे ठरले. आयसीसीने या स्पर्धेसाठी 17 खेळाडूंची निवड करायला परवानगी दिली होती, त्यामुळे टीम मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरू शकली.
- कुरखेडा येथे आयोजित शांतता सभेत नागरिकांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २२ : नागपूर येथील...