The गडविश्व
गडचिरोली, २४ जुलै : देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून लोकशाही आघाडी (एनडीए) च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांची निवड झाल्याबद्दल या विजयाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी गडचिरोली च्या वतीने शोभायात्रा मिरवणूक काढून विजयोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी प्रसंगी खा. अशोक नेते यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जीवन कार्यावर बोलतांना सर्व साधारण कुटुंबातील, दलित आदिवासी समाजातील, जीवनात संघर्ष करून भारतीय महिला राष्ट्रपती म्हणून निवड झाली हा इतिहास मानावा लागेल. तसेच दलित आदिवासीसाठी प्रेरणादायी व देशात गौरवशाली म्हणून ऐतिहासिक, दूरदृष्टी, देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती व देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून विराजमान झाल्याबद्दल त्यांचे मी मनापासून, हृदयातून,अंतकरणातून अभिनंदन करतो असे गौरवोद्गार केले.
याप्रसंगी खा.अशोक नेते, जिल्हाध्यक्ष किसन नागदेवते, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, महामंत्री गोविंद सारडा, महामंत्री प्रमोद पिपरे, एस.टी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, किसान आघाडीचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, माजी नगर परिषद अध्यक्षा योगीताताई पिपरे, महिला आघाडी प्रदेश सदस्या रेखाताई डोळस, प्रदेश सदस्य स्वप्निलजी वरघंटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, मोतीलाल कुकरेजा, माजी नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, हर्षल गेडाम, सुरज गुंडमवार, कोरेत, सदानंद कुथे, लताताई पुंगाटे, विलास भांडेकर, संजयजी बारापात्रे, तसेच अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


