बिबट्याच्या हल्ल्यात युवक ठार : चंद्रपूर शहरानजीकची घटना

242

– आठवडयातील दुसरी घटना
The गडविश्व
चंद्रपूर : शहरालगतच्या दुर्गापूर नेरी येथील युवकाला बिबटयाने उचलून नेत ठार केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. राज भडके रा. दुर्गापूर नेरी (१६) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
राज भडके हे सकाळच्या सुमारास फिरायला गेल असता बिबटयाने ग्रामपंचायतच्या मागील परिसरातून त्याला उचलून नेले व ठार केले. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. १६ फेब्रुवारी रोजी रात्रो १०.३० वाजताच्या सुमारास कंत्राटी कामगार भोजराज मेश्राम यांना वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती. एक दिवस होत नाही तोच आज पुन्हा बिबटयाने युवकाला ठार केल्याची घटना घडली. याआधिही अशा घटना घडल्या आहेत. या आठवडयातील ही दुसरी घटना आहे या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here