फुले – आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली येथे स्व. प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांना श्रध्दांजली

161

The गडविश्व
गडचिरोली, १२ ऑक्टोबर : स्थानिक श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्थेव्दारा संचालित फुले – आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली येथे श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्मृतिशेष शिक्षण महर्षी स्व. प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांच्या ११ व्या पुण्यतिथी निमित्य भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
त्यात सर्वप्रथम मातोश्री वृद्धाश्रम, गडचिरोली येथे महाविद्यालयाच्या वतीने अन्नदान करण्यात आले. तसेच सांस्कृतिक विभागाच्या वतीने महाविद्यालीन विद्यार्थ्यांसोबत वृक्षारोपण आणि स्व. प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी मार्गदर्शन व अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. के. खंगार हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणुन प्रा. प्रज्ञा वनमाली, प्रा. वाय. आर. गहाणे, प्रा. डॉ. विवेक गोर्लावार, प्रा. विनोद कुकडे, महाविद्यालयाचे प्रबंधक श्री. एस. के. इंगुलकर हे उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी स्व. प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे साहेब यांच्या प्रतिमेसमोर श्रध्दांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. एस. के. खंगार यांनी स्व. प्राचार्य रमेशचंद्रजी मुनघाटे यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्थेची स्थापना करून आदिवासी भागातील महिलांना शिक्षणाची दारे खुली करून दिली. ऐवढेच नव्हे तर संस्थेच्या उत्थानासाठी त्यांनी मागे सोडलेले ध्येय सर्वांनी मिळून पुर्ण करावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. वर्षा तिडके यांनी केले तर उपस्थितांचे आभार हितेश धानोरकर यांनी मानले.
यावेळी प्रा. डॉ. अभय लाकडे, प्रा. अजय निंबाळकर, प्रा. डॉ दिलीप बारसागडे, प्रा.कु.सरिता बुटले, प्रा. डॉ. किशोर कुडे, प्रा. सुरेश कंती, प्रा. दिपक तायडे, प्रा.कविता उईके, प्रा.हितेश चरडे, अविनाश वासेकर, प्रमोद शेंडे, संदिप बैस, लोमेश देशमुख, राजेश पोहाणे, कु. कादंबरी केदार, मनोज देशमुख, धनंजय हजारे, दिपक तिजारे, नरेश चंदेल, योगेश नैताम, लक्ष्मीकांत जोगी आदि मान्यवर, महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here