The गडविश्व
गडचिरोली : स्थानिक श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली यांच्या सांस्कृतीक विभागद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मालार्पण- पुष्पार्पण व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. खंगार तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. यादव गहाणे, प्रा. डॉ. दिलीप बारसागडे, सुधाकर इंगुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्दिशिकेचे वाचन करून करण्यात आली. यावेळी वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य यावर मत व्यक्त करून ते आपल्या आचरणात आणले पाहिजे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन निशांत चहांदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार हितेश धानोरकर यांनी मानले.
यावेळी महाविद्यालयाचे प्रा. कु. प्रज्ञा वनमाळी, प्रा. डॉ. विवेक गोर्लावार, प्रा. डॉ. अभय लाकडे, प्रा.डॉ. रुपेंद्रकुमार गौर, प्रा. डॉ. किशोर कुडे, प्रा. सुरेश कंती आदी प्राध्यापक वृंद तर कु. अनिता ठाकुर, प्रमोद शेंडे, महेंद्र गोवर्धन, महेंद्र जनबंधू, संदीप बैस, लोमेश देशमुख, राजेश पोहणे, कु. कादंबरी केदार, इमरान पठाण, दीपक तिजारे, माणिक माटे, योगेश नैताम, राजेश डोये, मनोज देशमुख, धनंजय हजारे, लक्ष्मीकांत जोगी आदी शिक्षकेत्तर व ग्रंथालय विभागातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.