– समोर आला रॉकीचा फर्स्ट लूक
The गडविश्व
मुंबई : KGF चित्रपटामुळे साऊथ सुपरस्टार यशला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. ८ जानेवारी रोजी त्याचा वाढदिवस होता. त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. परंतु यशनेसुद्धा आपल्या चाहत्यांना वाढदिवशी मोठे सरप्राईज दिले आहे. त्याच्या वाढदिवसादिवशीच KGF 2 चा फर्स्ट पोस्टर रिलीज झाला आहे. शिवाय त्याची रिलीज डेटसुद्धा समोर आली आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्याचा डेंजर लूक पाहायला मिळत आहे.
यशचा KGF चॅप्टर 1 सुपरडुपर हिट ठरला होता. चाहत्यांना अनेक दिवसांपासून त्याच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा लागून होती.या चित्रपटाचा दुसरा भाग गेल्यावर्षीच रिलीज होणार होता. परंतु कोरोना संकटामुळे या चित्रपटाची रिलीज डेट सतत पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे चाहते नाराज होते. परंतु यशच्या वाढदिवसादिवशीच मेकर्सनी चाहत्यांना मोठे सरप्राईज दिलं आहे. ८ जानेवारी रोजी KGF 2 चा पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये यशचा फर्स्ट लूक पाहायला मिळत आहे. हा चित्रपट 14 एप्रिलला रिलीज होणार आहे. तब्बल 5 भाषांमध्ये हा चित्रपट पाहायला मिळणार आहे.

Caution ⚠️ Danger ahead !
Happy Birthday my ROCKY @Thenameisyash.Can't wait for this monster to conquer the world on April 14th, 2022.#KGFChapter2 #KGF2onApr14 #HBDRockingStarYash pic.twitter.com/uIwBZW8j3F
— Prashanth Neel (@prashanth_neel) January 8, 2022
या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी आपल्या ट्विटर हँडलवर हा पोस्टर रिलीज केला आहे. त्यांनी पोस्टरसोबत ट्विट करत लिहिले आहे, ‘सावधान… समोर धोका आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या रॉकी’.. 2022 मध्ये या राक्षसी जगाला जिंकण्यासाठी प्रतीक्षा नाही करू शकत’. असे लिहीत त्यांना आपली उत्सुकता दाखवून दिली आहे.
KGF हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने जगभरात तुफान कमी केली होती. चित्रपटातील यशच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झाले होते. चाहते आतुरतेने त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहात होते. 2021 मध्ये रिलीज होणार हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज होणार आहे. आता लवकरच चाहत्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे. KGF 2 मध्ये यशसोबत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त, रविना टंडन, श्रीनिधी शेट्टी महत्वाच्या भूमिकेत आहेत. शिवाय प्रकाश राज, मालविका, अच्युत कुमार असे अनेक कलाकार आहेत.