बारावीचा निकाल उद्या ८ जून रोजी होणार जाहीर, निकाल कसा पहायचा जाणून घ्या

4940

The गडविश्व
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल उद्या बुधवार ८ जून २०२२ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे . अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सर्व विभागांतील दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल येत्या काही दिवसात जाहीर होतील अशी माहिती दिली होती. त्यानुसार आता निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

उद्या दुपारी एक वाजता निकाल लागणार. हा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra Board) अधिकृत वेबसाईटवर www.mahahsscboard.in बघायला मिळणार आहे. निकाल पाहण्यासाठी परीक्षेचा सीट नंबर/ रोल नंबर आणि आईचं नाव टाकणं आवश्यक असणार आहे. सीट नंबर चुकला तर आईच्या नावाने निकाल पाहता येणार आहे.

या परीक्षेस १४,८५,१९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,१७,१८८ मुलं असून मुलींची संख्या ६,६८,००३ एवढी आहे.

अधिकृत संकेतस्थळ :

http://www.mahresult.nic.in/

http://www.hscresult.mkcl.org/

https://hsc.mahresults.org.in/

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी ( श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-hsc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शुक्रवार १० जून २०२२ ते सोमवार २० जून २०२२ पर्यंत व छायाप्रतीसाठी शुक्रवार १० जून २०२२ ते बुधवार २९ जून २०२२ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card / Credit Card/UPI/Net Banking) याद्वारे भरता येईल.
मार्च – एप्रिल २०२२ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
मार्च – एप्रिल २०२२ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी / गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.
जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार १० जून २०२२ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.
मार्च – एप्रिल २०२२ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शुक्रवार १७ जून २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता वितरित करण्यात येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here