पोलीस-नक्षल चकमक : एका महिला नक्षलीस कंठस्थान घालण्यात पोलीस दलास यश

388

– घटनास्थळावरून मृत्यूदेह ताब्यात, मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता, शोधमोहीम सुरु

The गडविश्व
सुकमा : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एका महिला नक्षलीचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. घटनास्थळावरून नक्षलीचा मृतदेहही ताब्यात घेण्यात आलाआहे.
प्राप्त माहितीनुसार, सुकमा जिल्ह्यातील मर्जुम भागात आज मंगळवारी सकाळच्या सुमारास जवान आणि नक्षल्यांमध्ये भीषण चकमक झाली. असे सांगण्यात आले आहे की दंतेवाडा, बस्तर आणि सुकमा जिल्ह्यातील डीआरजी पथके संयुक्त कारवाईसाठी बाहेर पडली. दरम्यान, पुस्नार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मर्जुम परिसरात नक्षल्यांनी जवानांना पाहताच गोळीबार सुरू केला. डीआरजी जवानांनी तात्काळ पुढाकार घेत नक्षल्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. जवानांचा वाढता दबाब पाहून नक्षल्यांनी जंगलाच्या पळ काढला.
मर्जुम परिसरात मोठ्या प्रमाणात नक्षली असल्याची माहिती मिळताच तीन जिल्ह्यांतील डीआरजी पथकांना विशेष ऑपरेशनसाठी पाठवण्यात आले. डीआरजीच्या जवानांच्या शौर्यासमोर नक्षली उखडले गेले आणि त्यांना पळून जावे लागले.
जवानांनी घटनास्थळावरून एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. चकमकीत एसीएम रँकची महिला नक्षलवादी ठार झाल्याची बातमी आहे. सुकमाचे एसपी सुनील शर्मा यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, अधूनमधून गोळीबार सुरू आहे. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे या चकमकीत इतर अनेक नक्षलवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here