– रस्ते बांधकामाच्या कामाच्या सुरक्षेसाठी जवान निघाले असताना हल्ला
The गडविश्व
रायपूर : छत्तीसगड- ओडिशा सीमेवर मंगळवारी पोलीस-नक्षल चकमक उडाली. या चकमकीत सीआरपीएफचे ३ जवान शहीद झाले आहे. तर काही जवान जखमी झाल्याची माहिती आहे.
ओडिशा राज्यातील नुआपाड जिल्ह्यातील भैसनसादनी भागात सुरू असलेल्या रस्ते बांधकामाच्या कामाच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ जवानांची एक तुकडी निघाली असताना आधीच घात लावून बसलेल्या नक्षल्यांनी जवानांवर हल्ला केला. या दरम्यान जवानांनीही प्रत्युत्तर देत गोळीबार केला. दरम्यान जवानांचा वाढता दबाव पाहून नकली जंगलाच्या दिशेने पसार झाले. या चकमकीत शिशुपाल सिंग (एएसआय), शिवलाल (एएसआय) आणि धर्मेंद्र कुमार सिंग (संरक्षक) हे जवान शहीद झाले आहे.
या चकमकीत नक्षल्यांचेही मोठे नुकसान झाले असून अनेक नक्षली मारले गेले तसेच जखमी झाल्याचा दावा जवानांनी केला आहे. मात्र, आतापर्यंत एकाही नक्षलीचा मृतदेह हाती लागलेला नसल्याची माहिती आहे. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी चकमक पूर्णपणे थांबली आहे आणि परिसरात सतत शोधमोहीम सुरू असल्याचे सांगितले. तसेच चकमकीदरम्यान नक्षल्यांनी जवानांवर बीजीएल (बॅरल ग्रेनेड लाँचर) गोळीबार केला व घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बीजीएलचे अवशेषही सापडल्याचे सांगण्यात येत आहे.