The गडविश्व
गडचिरोली : पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांचे संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील आदिवासी युवकांकरीता पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. सदर पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत असलेल्या युवकांकरीता लाईफ स्किल फॉऊंडेशन नागपूर यांच्या मार्फतीने भव्य कार्यशाळेचे आयोजन आज २३ मार्च २०२२ रोजी एकलव्य धाम गडचिरोली येथे करण्यात आले.
सदर कार्यशाळेत ओरिएंटेशन प्रोग्राम ऑन मॉटीव्हेटींग ट्रायबल युथ ऑफ गडचिरोली डीस्ट्रिक्ट या विषयावर आदिवासी युवकांना भारतीय संरक्षण दल, डिफेन्स फोर्सेस, पैरामिलीट्री फोर्मेस तसेच महाराष्ट्र पोलीस दल इत्यादी मधील विविध संधीबाबत मार्गदर्शन करण्यात आले असून, कार्यशाळेकरीता पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत असलेले २३० आदिवासी युवक हजर होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा. व अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा. यांनी उपस्थित आदिवासी युवकांना पोलीस भरतीबाबत मार्गदर्शन केले.पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यंत ७८० आदिवासी युवक-युवतींनी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला असून, सदर कार्यशाळेच्या आयोजनामुळे गडचिरोली जिल्हयातील आदिवासी युवकांना भारतीय संरक्षण दल, डिफेन्स फोर्सेस, पैरामिलट्री फोर्सम तसेच महाराष्ट्र पोलीस दल इत्यादीमध्ये आपले करिअर घडविण्यासाठी मोलाची मदत होणार आहे.यावेळी कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा. , अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणुन लाईफ स्किल फॉऊंडेशनचे एअर व्हाईस मार्शल विजय वानखेडे, कर्नल राजू पाटील, प्राध्यापक अनिल वानखेडे (कार्यशाळा अधिक्षक शासकिय तंत्र निकेतन नागपूर) च लाईफ स्किल फॉऊंडेशनच्या संचालिका डॉ. राजेश्वरी वानखेडे हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.