The गडविश्व
भामरागड, २० ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्यात सततच्या पावसाने तसेच धरणाचे पाणी सोडल्याने घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. या अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसाने घराचे व शेतीचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पुरामुळे अनेक नागरिकांचे घरे सुद्धा पडले. याची दखल घेत खा.अशोक नेते यांनी भामरागड परिसरातील पूर पीडितांना अन्नधान्य किट्सचे वाटप केले.
त्याप्रसंगी खा.अशोक नेते, प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा, रविंद्र ओल्लालवार संघटन जि. महामंत्री, विनोद आकनपलीवार जिल्हा उपाध्यक्ष, सुनिल विशवास ता.अध्यक्ष, सागर डेकाटे युवा मोर्चा उपाध्यक्ष, धनंजय पडशाल उपस्थित होते.