– असरअल्ली येथील जयानारायण मुम्माडी यांचे घर गेले वाहून
गडविश्व
सिरोंचा, ३० जुलै : गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या मेडिगड्डा धरणातून विसर्ग केलेले पाणी आणि जुलै महिन्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर येऊन पुरात असरअल्ली येथील जयानारायण मुम्माडी यांच्या घर पाण्याखाली येऊन घरातील जीवनावश्यक वस्तूसह घरातील संपूर्ण समान पुरात वाहून गेल्याने मुम्माडी कुटुंब बेघर झाल्याची माहिती मिळताच जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी पूरग्रस्त मुम्माडी कुटुंबाची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली तसेच शासनाकडून मिळणाऱ्या योजना पूरग्रस्त कुटुंबापर्यंत पोहचवून देण्यासाठी अविस कटिबद्ध असल्याचे यावेळी कंकडालवार यांनी सांगितले.
यावेळी आविसंचे सिरोंचा तालुका अध्यक्ष अध्यक्ष बानय्या जनगाम, अविस जेष्ठ नेता शंकर मंदा, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मल्लिकार्जुन आकुला, धर्माय्या कोठारी, उपसरपंच सल्ला, माजी सभापती भास्कर तलांडी, माजी जिप सदस्य अजय नैताम, सरपंच रमेश तैनेनी, सरपंच सूरज गावडे, माजी सरपंच दिलीप गंजीवार, न.प सिरोंचा स्वीकृत नगरसेवक राजेश बंदेला, अविस शहर अध्यक्ष रवी सुलतान, मारोती गणापूरपूवार, किरण वेमुला, संतोष भिमकरी, अविस सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिटयाला, सतीश जवाजी, साई मंदा, गणेश राच्चावार, विजय तुमडे, संजय चिंताकन्नी, सागर कोठारी, समय्या तोरकरी, सुकदेव, महेश तोरकरी, स्वामी चप्पिडी, सडवली राजु गूडूरी, दुर्गेश लांबाडी, लक्ष्मण बोल्ले, लक्ष्मण गावडे, कलाम शेख, विनोद भूपती, रमेश धर्मी, महेश तलांडी, संपत गोगुलासह सिरोंचा तालुक्यातील अविसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
