पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून जिल्हा विकासाच्या पथावर

162

राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. एकनाथ शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आदरणीय ना. एकनाथ शिंदे साहेब गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हाती घेतल्यापासून आपण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक विकासकामे मार्गी लावली. येथील जनतेच्या मूलभूत सोयीसुविधेचे प्रश्न व अनेक समस्या संवेदनशीलपणे सोडविल्या.त्यामुळे गडचिरोली जिल्हा विकासाच्या पथावर मार्गक्रमण करीत आहे.
जिल्ह्यातील विकासकांमाबरोबरच गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेनेच्या पक्ष संघटना बळकटी करणासाठी आपण विशेष लक्ष दिले.व मला जिल्हा संघटकपदाची जबाबदारी सोपविली.आपल्या मार्गदर्शनात मी जिल्ह्यतील दुर्गम भागातील व तळागाळातील शिवसैनिकां सोबत नगरपंचायत निवडणुकीत परिश्रम घेतले. याचेच फलित म्हणून यापूर्वी एकही नगरसेवक नसलेल्या शिवसेनेने समाधानकारक यश संपादन केले. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील मूलचेरा नगरपंचायतीवर शिवसेनेचा नगराध्यक्ष विराजमान होणार असून हे मिळालेले यश हे आपले नेतृत्व व मार्गदर्शन व शिवसैनिकांनी केलेल्या मेहनतीचे फलित आहे.
मूलचेरा नगरपंचायतीवर फडकलेला शिवसेनेचा भगवा ही माझ्याकडून व समस्त शिवसैनिकाकडून आपणास वाढदिवसाची गिफ्ट आहे.
श्री. किरण पांडव
जिल्हा संघटक गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here