कोरची : पारबताबाई विद्यालयातील ४७ विद्यार्थ्यांनी घेतली कोरोनाची लस

170

THE गडविश्व
कोरची : गडचिरोली जिल्ह्यातील 15 ते 18 वर्ष वयोगटातील 55 हजार 522 मुला-मुलींना कोव्हाक्सिंनचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवून 3 जानेवारी पासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली . जिल्ह्यातील कोरची येथील पारबताबाई विद्यालयात वर्ग 9 ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या 47 विद्यार्थ्यांनी कोरोनाची लस काल बुधवार ५ जानेवारी रोजी घेतली.
तत्पूर्वी कोरोना लसीबद्दल जनमानसात पसरलेल्या अफवांबाबत शाळेचे मुख्याध्यापक शालीकराम कराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोरोना लस पुर्णतः सुरक्षित असून त्याचे कोणत्याही प्रकारचे विपरीत परिणाम होत नाही. यापूर्वी ते स्वतः कोरोना लसीचे दोन्ही डोज घेतल्याचे सांगून महामारी च्या वेळी लस एक उपाय आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार 15 ते 18 वयाच्या विद्यार्थ्यांनी लस घ्यावे असे आवाहन केले होते. पालकांना सुद्धा याची जाणीव करून दिली होती. पालकांकडून संमती पत्र लिहून घेतले होते. यावेळी पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाला.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. बागराज धुर्वे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राऊत, डॉ. सचिन बरडे, उमाशंकर मुळे, उमा देवांगन, माधुरी पुलो, रुपेश भैसारे, सुमित मनहोरे ,देवा पुराम, योगीराज बगमारे आदी आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक शालीकराम कराडे, सुरज हेमके आणि शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here