पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात : बीकानेर-गुवाहटी एक्सप्रेसचे सहा डबे रुळावरुन घसरले

264

The गडविश्व
कोलकत्ता : पटनावरुन गुवाहटीच्या दिशेने जाणाऱ्या बीकानेर एक्सप्रेसला ( गाडी नंबर – १५६३३ ) आज संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडी भागात मोयनागुडी रेल्वे स्थानकाच्या जवळ हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार २४ डबे असलेल्या एक्सप्रेसचे इंजिनच्या जवळचे सहा डबे रुळावरुन घसरले आहेत. अपघातानंतर दोन डबे एकमेकांवर पडल्याचे दिसून आले आहे.
या अपघातामध्ये नेमके किती जण जखमी झालेत, किती गंभीर आहेत, अपघातामध्ये किती प्रवाशांचा मृत्यु झाला आहे या गोष्टी अजुनही स्पष्ट झाल्या नाहीत. घटनास्थळी मदत करणारी विविध पथके पोहचली असून स्थानिकांच्या मदतीने जखमी लोकांना बाहेर काढण्याचे, उपचार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. नेमका हा अपघात कशामुळे झाला हे स्पष्ट झाले नाही. या भागात धुके असल्याने आणि आता अंधार पडल्याने मदतकार्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here