The गडविश्व
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील पवनी जंगलपरिसरात विविध ठिकाणी टाकलेला जवळपास ४५ हजार रुपये किंमतीचा सात ड्रम मोहफुलाचा सडवा नष्ट केल्याची कृती मुक्तिपथ तालुका चमूने केली.
धानोरा शहरानजीकच्या पवनी गावात जवळपास ५० ते ६० घरी अवैध दारूविक्री केली जाते. त्यामुळे धानोरा शहरातील मद्यपींसह परिसरातील गावातील लोक सुद्धा दारू पिण्यासाठी पवनी गावाकडे येत असतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावातील काही विक्रेत्यांनी जंगलपरिसरात विविध ठिकाणी मोहफुलाचा सडवा टाकून ठेवल्याची माहिती मुक्तिपथ तालुका चमूला प्राप्त झाली. माहितीच्या आधारे जंगलपरिसरात शोधमोहीम राबवून विविध ठिकाणी टाकून असलेला जवळपास ४५ हजार रुपये किमतीचा सात ड्रम सडवा व साहित्य नष्ट करण्यात आले.