पथकाच्या माध्यमातून दारूविक्रेत्यांवर कारवाईचे नियोजन

159

-एटापल्ली तालुका समितीची बैठक
The गडविश्व
गडचिरोली : एटापल्ली येथे मुक्तिपथ तालुका समितीची बैठक तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शहर परिसरातील अवैध दारूविक्रीचे प्रमाण कमी करण्यासाठी पथकाच्या माध्यमातून मोठ्या दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याचे ठरविण्यात आले. सोबतच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत मुक्तिपथ अभियानाचे उपसंचालक संतोष सावळकर, पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील, संवर्ग विकास अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते स.ना.खापने, वंदना गावडे, तालुका संघटक किशोर मलेवार उपस्थित होते.
यावेळी तालुका स्तरीय समिती पुनर्गठन करण्यात आली. पोलिस विभागाद्वारे शहरात व गावपातळीला असलेले मोठे दारू विक्रेत्यांवर कारवाई करून विक्री बंद करण्यासाठी कृतीचे नियोजन करण्यात आले. प्रत्येक गाव पातळीला दारू व तंबाखू मुक्तीकरिता ग्रामपंचायत समिती तयार करून त्या समितीला कृतीशील होण्यासाठी संवर्ग विकास अधिकारी यांनी ग्रामसेवकांना आदेश देणे. गाव संघटनेला ग्रामपंचायत द्वारा मान्यता देणे. नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या आदेशान्वये शहर पातळीवर एक पथक गठित करून दर १५ दिवसांनी नोटीस देऊन दंड वसुली करेल. सर्व पानठेले व किराणा दुकानधारकांना सुगंधित तंबाखू विक्री बंद करण्याबाबत सूचना देऊन तपासणी करणे. मुक्तिपथ द्वारा सुरु असलेल्या तालुका व्यसनउपचार क्लिनिकची माहिती देऊन उपचार घेण्याचे आवाहन करणे. आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here