The गडविश्व
गडचिरोली, १९ ऑक्टोबर : स्थानिक पंचायत समिती येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत “आमचा गाव आमचा विकास” गाव कृती आराखडा बाबत सरपंच, सचिव यांचे तालूका स्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते यावेळी जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी
जि.प. चे पाणी व स्वच्छता उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक एफ. आर. कुत्तीरकर यांनी भेट दिली. दरम्यान सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक टॉयलेट, वैक्तिक टॉयलेट विहित वेळेत करणे बाबत सूचना देण्यात आले व संपूर्ण तालूका ओ. डी. एफ. प्लस करून दृश्यमान स्वच्छता निर्माण करावी व गावे सुंदर -स्वच्छ बनविण्याबाबत मार्गदर्शन केले.
गाव कृती आराखडा तयार करताना पाणी व स्वच्छतेची आवश्यक कामाची निकड लक्षात घेऊन कामाची निवड करण्यात यावी असे निर्देश दिले. त्याच प्रमाणे माजी सभापती इचोडकर व गट विकास अधिकारी साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक हात धुवा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या वेळी कार्यालयीन कर्मचारी, सरपंच सचिव, विस्तार अधिकारी अमोल भोयर, के. जी. बोपनवार पंचायत, पी. पी. पदा कृषी अधिकारी, पं. स. गडचिरोली राहुल दिवटे, कु.कुमुद शेबे इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रदीप बरई समन्वयक पाणी व स्वच्छता यांनी केले तर आभार रुपेश पेंटलवार यांनी मानले.
