The गडविश्व
ता.प्र / धानोरा : पंचायत समिती धानोरा अंतर्गत आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्याकरिता “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्याकरिता ग्रामीण भागात अडचण जाऊ नये म्हणून पंचायत समिती मधील “डेमोहाऊस” या इमारतीमध्ये विक्री केंद्राचे उद्घाटन आमदार डॉ.देवराव होळी यांच्या हस्ते आज ११ऑगस्ट रोजी संपन्न झाला.
उद्घाटन प्रसंगी प्रत्येक घरी तिरंगा ध्वज फडकवून देशाचा अमृत महोत्सव सर्वांनी साजरा करावा असे आवाहन उद्घाटन प्रसंगी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले. त्यानंतर पंचायत समिती आवारात यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष शशिकांत साळवे, साईनाथ साळवे, ज्येष्ठ कार्यकर्ते, नगरसेवक लंकेश मशाखेत्री, संजीव कुंडू, सारंग साळवे, साजन गुंडावार, गट विकास अधिकारी सतीश टिचकुले, लुमदेव जुवारे, विस्तार अधिकारी पंचायत, किशोर ठाकरे कृषी विस्तार अधिकारी, पंचायत समिती व जिल्हा परिषद उपविभाग बांधकाम चे सर्व शाखा अभियंता, पंचायत समितीचे सर्व कर्मचारी, सर्व ग्रामसेवक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी ७० टक्के शासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीला कुटुंबनिहाय तिरंगा शासनातर्फे वितरित करण्यात आला व ३० टक्के कुटुंबांना ग्रामपंचायत मार्फत राष्ट्रध्वज विक्री केंद्रातून घेण्यात आला.
यावेळी सर्व ग्रामपंचायतीने मुख्यालयी राष्ट्रध्वज घेऊन गेले. कार्यक्रमाचे संचालन विस्तार अधिकारी जुआरे यांनी केले.
