निष्पाप पाळीव श्वानाच्या पायाला भला मोठा दगड बांधून नदीमध्ये फेकले ; श्वानाचा मृत्यू

1345

– माणुसकीला लाजवेल असे कृत्य, व्हिडीओ वायरल

The गडविश्व
चंद्रपूर, १८ जुलै : एका निष्पाप पाळीव श्वानाच्या पायाला भला मोठा दगड व तोंड ताराने बांधून नदीमध्ये फेकून दिल्याची माणुसकीला लाजवेल अशी घटना जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील दहेली येथून उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये निष्पाप श्वानाचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातील व्हिडिओही वायरल करण्यात आला आल्याचे कळते.
बल्लारपूर तालुक्यातील दहेली येथे तीन ते चार युवकांनी प्रथम श्वानाच्या पायाला दगड बांधला आणि मानेला फास आवळून त्याला नदीच्या पाण्यात मरण्यासाठी फेकून दिले. मात्र जिवाच्या आकांताने मोठा प्रयत्न करून तो तो नदीतून पोहून बाहेर आला. पाळीव असल्याने पुन्हा तो त्या युवकांजवळ आला. मात्र त्याला मारण्याचा पूर्णपणे विचार करून आलेल्या युवकांनी त्याचे पाय बांधून भलामोठा दगड बांधला. त्यानंतर तोंडाला ताराने बांधून पुन्हा नदीच्या पाण्यात फेकले. या वेळी मात्र तो पाण्यातून वर आलाच नाही. यासंदर्भातील व्हिडिओ सर्वत्र वायरल झाला. त्यानंतर येथील प्यार फाऊंडेशनच्या सदस्यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली असून अत्यंत निर्दयी कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.विशेष म्हणजे या घटनेसंदर्भातील व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्यात आला. यामुळे एकच संताप व्यक्त केला जात आहे. या अमानुष घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here