ना. विजय वडेट्टीवार यांच्या कडून उपरी येथील अपघातग्रस्तांना आर्थिक मदत

389

The गडविश्व
सावली : राज्याचे बहुजन कल्याण, मदत व पूर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार हे नुकतेच सावली येथे दौऱ्यावर आले असता उपरी येथील सरपंचा कुमुदताई सातपुते व सावली तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष मनबतुलवार यांनी तालुक्यातील अपघातग्रस्त कुटूंबियाबाबत माहिती दिली असता ना. विजय वडेट्टीवार यांच्या कडून अपघात ग्रस्त कुटुंबाना आर्थिक मदत करण्यात आली.
तालुक्यातील रुपेश कुकुडकर यांचा किडनी आजाराने, डोकू कावरू भोयर यांचा ह्र्दय विकाराच्या झटक्याने, कर्जबाजारीपणामुळे चरणदास सदू कोठारे यांनी गळफास लावून आत्महत्या केली तर सुषमा तुडशीराम वासेकर यांचा कॅन्सर आजाराने मृत्यू झाला. या अपघात ग्रस्त कुटुंबातील व्यक्तींना ना. विजय वडेट्टीवार यांच्या कडून आर्थिक मदत करण्यात आली. सदर मदत गावच्या प्रथम नागरिक सौ. कुमुदताई सातपुते यांचे हस्ते देण्यात आली.
यावेळी सावली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन गोहणे, सावली तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष मनबतूलवार, सुमित्रा भोयर सदस्य ग्रामपंचायत उपरी, दीपक कोठारे सदस्य,अनिल कांबळे माजी उपसरपंच, दिलखूष सातपुते, सुनीता शेटे, श्रीकृष्ण शेटे, मोरेश्वर सातपुते, युवक नेते तथा पत्रकार अनिल भाऊ गुरुनुले, संजय गांधी निराधार योजनीचे सदस्य दिवाकर काचीनवार, हिरापूर चे उपसरपंच शरद कंनाके उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here