ना. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

161

– वृंदावन येथे श्रीकष्ण मंदीरात भोग चढवून किरण पांडव यांच्या हस्ते दहा हजार मिठाई बॉक्सचे वितरण
The गडविश्व
गडचिरोली : राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
९ फेब्रुवारी रोजी ना. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने वृंदावन येथे श्रीकृष्ण मंदिरात भोग चढवून गडचिरोली जिल्ह्यचे जिल्हा समन्वयक किरण पांडव यांच्या हस्ते दहा हजार मिठाई बॉक्सचे ठाण्यात वितरण करण्यात आले. यावेळी ना. एकनाथ शिंदे यांनी जिल्हा समन्वयक किरण पांडव यांच्या कामाच्या पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
ना.एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री पद स्विकारल्यापासून जिल्हा विकासाच्या पथावर आहे. जिल्हयातीन अनेक तालुक्यात विकास कामे प्रगतिपथावर आहे तसेच जिल्हयातील मुलचेरा नगरपंचायतीवर जिल्हा समन्वयक किरण पांडव यांच्या नेतृत्वात व जिल्हयाातील शिवसेैनिकांच्या नियोजनबध्द व्यवस्थापनेमुळे मुलचेरा नगरपंचायतीवर शिवसेनच्या 6 जागा निवडून येण्यास यश आले आहे. गडचिरोली जिल्हयाच्या विकास कामांकरिता किरण पांडव नेहमीच तत्पर असून अधिकाअधिक विकास कामे ना.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात करण्याचा त्यांचा मानस आहे. यावेळी ना. एकनाथ शिंदे यांनी जिल्हा समन्वयक किरण पांडव यांच्या कामाला पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या व गडचिरोली जिल्ह्याकरीत अधिकाधिक निधी खेचून जिल्ह्याला विकासाच्या पथावर नेण्यास नेहमीच तत्पर असल्याचेही सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here