नागपूर : सट्ट्याच्या व्यसनापायी कुटुंबाचा घात

189

The गडविश्व

नागपूर : काल येथील दयानंद पार्क परिसरातील एका घरात चार मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली . सदर घटना कशी घडली याचा तपास पोलीस करीत होती. मात्र आता या घटनेची माहिती समोर आली असून सट्ट्याच्या व्यसनापायी मदन अग्रवाल या तरुणाने आपल्या दोन चिमुकल्यांची आणि पत्नी किरणची हत्या करून आत्महत्या केली असल्याचे सामोर आले आहे.

मदनचा चायनीजचा व्यवसाय होता. व्यवसाय चांगला चालत होता. मात्र त्याला त्याचवेळी क्रिकेट सट्ट्याचे व्यसन लागले. त्यात त्याने होते नव्हते कमावलेले सर्व गमावले. या सट्ट्यापायी तो कर्जाच्या विळख्यात अडकला. व तीन महिन्यांपूर्वी बँकेने त्याचे घरही जप्त केले होते व सध्या तो भाड्याच्या घरात राहत होता. अखेर मंगळवारी त्याने टोकाचे पाऊल उचलत कुटुंबासह स्वतःचाही घात केला.
मदनच्या एका चुकीमुळे पत्नी किरण, दहा वर्षांचा वृषभ आणि पाच वर्षांच्या टियाला आपला जीव गमवावा लागला आहे. झटपट पैसे कमावण्याच्या नादात एक अख्खे कुटुंब जिवानिशी गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here