नागपूर येथे १ मे पर्यंत ई-लायब्ररी सुरू होणार : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

450

– ई-लायब्ररीत डिजिटल वृत्तपत्रांबरोबर, पुस्तके, मराठी वाक्यप्रचार विविध प्रकारच्या माहितीचे स्त्रोत उपलब्ध होणार
The गडविश्व
मुंबई : नागपूर महानगरपालिका अंतर्गत मानेवाडा येथे अद्यावयात अशा ई-लायब्ररीच्या इमारतीचे बांधकाम झाले असून या ई-लायब्ररीत डिजिटल वृत्तपत्रांबरोबर, पुस्तके, मराठी वाक्यप्रचार अशा विविध प्रकारच्या माहितीचे स्त्रोत विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ई-लायब्ररीत दुर्मिळ तसेच हस्तलिखित साहित्यही उपलब्ध असणार असून या लायब्ररीचे बांधकाम पूर्ण होत असून उर्वरित कामे युद्धपातळीवर करून 1 मे पर्यंत ही ई-लायब्ररी सुरू करण्यात येईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांचा विकास या योजनेंतर्गत या ई-लायब्ररीकरिता प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून याकरिता निधीची कमतरता भासल्यास ती पूर्ण करण्यात येणार असल्याचेही मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
ई-लायब्ररी संदर्भात प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here