The गडविश्व
नागपूर : नागपुरातील एका खाजगी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या 39 वर्षीय डॉक्टरने भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डॉ. अभिजीत रत्नाकर धामणकर असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे.
मृतक डॉक्टर हे नागपुरातील सेंट्रल एव्हेन्यूवरील किमया हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. कर्तव्यावर असतानाच त्यांनी भल्या पहाटेचे भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेतला. याबाबत रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांना माहित होताच नर्सने त्यांना एक तास व्हेंटिलेटरवर ठेवून कृत्रीम श्वास देण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. पहाटे पाचच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली असता, त्यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली आहे. त्यामध्ये त्यांनी मृत्यूचे कारण लिहिले आहे. सीमा गायकवाड, विनय गायकवाड, राहुल लोखंडे आणि तांबेबाई यांच्याकडून होणाऱ्या त्रासामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सुसाईट नोटमध्ये नमूद केले आहे.