The गडविश्व
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील नवेगांव येथे गाव संघटनेच्या मागणीनुसार एक दिवशीय व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत गावातील एकूण १८ रुग्णांनी उपचार घेतला.
गावातील रुग्णांना उपचार मिळावा, या उद्देशाने गाव संघटनेच्या वतीने व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील १८ रुग्णांनी नोंदणी करीत पूर्ण उपचार घेतला व दारूच्या व्यसनातून बाहेर पडण्याचा संकल्प घेतला आहे. सोबतच रुग्णांना समुपदेश करीत औषधोपचार करण्यात आले. रुग्णांना दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात आदींची माहिती देत साईनाथ मोहुर्ले यांनी रुग्णांना समुपदेशन केले. संयोजिका पूजा येलूरकर यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेत धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती दिली. शिबिराचे नियोजन तालुका संघटक केशव चव्हाण यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी गाव संघटनेचे सदस्य उपसरंच महेश मोहूर्ले, पोलिस पाटील प्रभाकर शेंडे, गजानन मोहूर्ले, आशा स्वयंसेविका संगीता मोहूर्ले, आरोग्य सेविका मंगला मोहूर्ले, यश चव्हाण यांनी सहकार्य केले.